दापोली : गेल्या 5 दिवसापासून उस्मान खान 38 वर्षीय तरुण गाडीसह बेपत्ता, शेवटचं ठिकाण दापोली नगरपंचायत

दापोली : गेल्या 5 दिवसापासून उस्मान खान 38 वर्षीय तरुण गाडीसह बेपत्ता, शेवटचं ठिकाण दापोली नगरपंचायत

banner 468x60

दापोलीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसापासून दापोलीत तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

banner 728x90

उस्मान समी खान वय 38 हा तरुण गाडीसह अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. उस्मान समी खान हा 3 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. दापोली पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

उस्मान समी खान हा पी.ओ.पी कामाचे कॉन्ट्राक्ट घेतो त्यामुळे त्यांनी दापोली येथील फॅमिलीमाळ येथे प्लॅट घेतलेला आहे, तिथे तो एकटाच राहत होता.

उस्मानचा भाऊ उस्मान यांची पत्नी नाजीया, मुलगा फरहान, मुलगी तनाज, छोटी मुलगी अरफा असे कुंटुंब महाड येथे राहण्यास आहे. उस्मान खान हा महाड येथे कुंटुबाकडे येऊन जाऊन असायचा आणि कधी कधी कामानिमित्त तो बाहेरगावी जात असे. गेल्या पाच दिवसापासून शोधकार्य सुरु आहे मात्र मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागला नाही.


याबाबतचं सविस्तर वृत्त असं आहे 03/08/2024 रोजी सकाळी 09.30 वाजता महाड येथुन स्वताच्या मालकीची हुंडाई वेरणा गाडी क्र MH 06 BD 2010 घेऊन दापोली येथे आला होता त्यानंतर तो रुमवरुन अंघोळ करुन त्याचा मित्र मिराज अहमद नियाज अहमद खान याला 11.45 वाजता दापोली नगरपंचायत समोर भेटला.

तिथे त्यांनी चहापाणी केली आणि दोघेजण आपापल्या कामाकरिता निघून गेले असं त्याचा मित्र मिराज अहमद खान याने उस्मान याच्या भावाला (इसाक) सांगितले असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क किंवा बोलणं झालेले नाही.

परंतु उस्मान खान याचे मोबाईल 9975507473 व 9422488632 या नंबरवर संपर्क केला असता त्यांनी कॉल उचलला नाही. त्याचा पुतण्या फरहान याचे व्हाटसअप नंबर वरती भाऊ उस्मान खान यांनी मेसेज केला की, व्यवहाराचे पैसे द्यायचे आहेत . त्यांचा कॉल येत असल्यामुळे फोन बंद ठेवत आहे.

उद्या संध्याकाळी महाडला घरी येत आहे असा मेसेज केला. मित्र मिराज अहमद खान याच्या व्हाटसअपवर मेसेज केला होता. उस्मानचा दापोलीच्या आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो कुठेही सापडला नसून त्याचा शोध घेण्याची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे.

दरम्यान उस्मान समी खान वय-38 वर्ष मुळ रा. महाड ता. मडाड जि. रायगड सध्या रा. फॅमिलीमाळ ता. दापोली जि. रत्नागिरी, रंग-सावळा, शिक्षण-5 वी, बांधा-मजबुत, चेहरा-उभट, उंची 5 फुट 5 इंच, केस काळे डोळे काळे, निशी काळी राखलेली, नेसणीस-निळ्या कलरचा

फुल हाताचा शर्ट व निळ्या कलरची पॅन्ट, डाव्या हातात घडयाळ, मोबाईल क्र- 9975507473 व 9422488632, गाडी- MH 06 BD 2010 ग्रे कलरची हुंडाई वेरणा चारचाकी गाडी सोबत आहे.

कुठेही आढळून आला तर दापोली पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचा अधिक तपास ए.एस.आय गायकवाड करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *