दापोलीत उडाण सर्व्हिसेस अँड इव्हेंटस् आयोजित दापोली महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दापोली आयडॉल पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावर्षीचा दापोली आयडॉल पुरस्कार कोकण कट्टा न्यूजचे संपादक आणि जय महाराष्ट्रचे वृत्तनिवेदक तेजस बोरघरे यांना दापोली आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
तेजस बोरघरे हे गेल्या 8 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र, लोकशाहीसारख्या न्यूज चॅनलमध्ये काम केलं असून आता जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत आहेत.
गेल्या ८ वर्षात बातम्यांच्या माध्यमातून कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न आणि जनतेला न्याय देणाऱ्या बातम्या त्यांनी केल्या आहेत. गेल्या एका वर्षापासून आपल्या सर्वांना परिचित असलेला त्यांचा चॅनेल कोकण कट्टा न्यूजचे संपादक म्हणूनही ते काम पाहत आहेत.
कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्यांचा इम्पॅक्ट झाला आहे. दापोलीतील अनेक सामाजिक बातम्या त्यांनी दिल्या आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक भूमिका घेऊन त्यांनी पत्रकारिता सुरू केलीय. सामाजिक बातम्या आणि जनहिताच्या बातम्या आणि सामन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत .
कोकण कट्टा न्यूजने एकाच वर्षात 50, हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. फक्त बातमी नाही तर आम्ही न्याय देतो वेगवान बातमी | अचूक आणि थेट भूमिका घेऊन कोकण कट्टा न्यूजचा प्रवास सुरु आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक छोटी सुरुवात त्यांनी केली आहे.
सत्याला धरुन पत्रकारिता आणि या प्रवासात सहकारी पत्रकार जाहीद मुजावर, सलीम रखांगे जे पूर्णपणे कोकण सांभाळतात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग याची जबाबदारी ते पार पाडत आहेत. कोकण कट्टा न्यूजचे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील राधा संदीप साडविलकर चिपळूण यांचं नेहमी सहकार्य आणि मदत असते. राधा साडविलकर या डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टाचं काम पाहतायत.
माध्यम तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सध्या कोकण कट्टा न्यूज काम करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
Responses (2)