दापोली : केळशीच्या तलाठ्याला 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

banner 468x60

दापोलीमधील मंडणगडमधील लाच प्रकरण ताजं असतानाच केळशीच्या तलाठ्याला 20 हजारांची लाच घेताना अँटी करप्शन ब्यूरोने रंगेहाथ पकडले आहे.

banner 728x90

केळशीचे तलाठी राजेंद्र उंडे यांना आज दुपारी 2.30 वाजता दापोली येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी आणि शेरा देण्याकरीता ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजेद्र उंडे, केळशी अति. पद‌भार मांदीवली यांनी 20 हजाराची लाच मागितली होती.

लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्यूरोने रंगेहाथ पकडले आहे. तक्रादार यांनी याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्यूरोला दिल्यानंतर सापळा रचून या तलाठ्याला पकडलं आहे.

या सापळा पथका मध्ये 1) सहाय्यक फौजदार चांदणे, 2)पोहवा संजय वाघाटे, 3) पो हवा. विशाल नलावडे 4) म पो हवा. श्रेया विचारे 5) पो हवा दीपक आंबेकर ६) पो कॉ. हेमंत पवार ७) पो. कॉ. राजेश गावकर ८) म पो. कॉ. समिता क्षीरसागर 9) चा पो ना प्रशांत कांबळे यांनी कारवाई केली आहे .

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

*अँटी करप्शन ब्यूरो, रत्नागिरी कार्यालय दुरध्वनी – 02352 222893/ टोल फ्रि क्रं. 1064*अविनाश पाटील**पोलीस उपअधीक्षक,**अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी**मोबाईल नं. 7588941247*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *