दोन दिवसापूर्वी कोकण कट्टा न्यूजने टी. डब्लु.जे फाउंडेशनकडून दापोलीतील मनोरुग्णांच्या उपचारासाठी रत्नागिरीत दाखल केले या मथळ्याखाली बातमी दिली आणि शुक्रवारी कोकण कट्टा न्यूजच्या बातमीनंतर, दापोलीतील तीन मनोरुग्णांना रत्नागिरी मनोरुग्णालयात पाठविले आहेत.
दापोली शहरात फिरणाऱ्या अनोळखी अशा एका पुरुष आणि दोन महिला मनोरुग्णांना चिपळूण येथील टीडब्ल्यूजे फाऊंडेशनच्या सौजन्याने प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे.
दापोली शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक पुरुष व दोन महिला मानसिक रुग्ण हे फिरत होते. या मनोरुग्णांमुळे दापोलीकर वैतागले होते. त्यामुळे त्यांनी दापोली पोलिसांकडे तक्रार केली होती.
त्यानुसार दापोली पोलिसांनी चिपळूण येथील आशिष कांबळे यांच्या टीडब्ल्यूजे फाऊंडेशनजवळ संपर्क साधला व त्यांच्या मदतीने या मनोरुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. या वेळी महिला पोलीस नाईक खांबे, होमगार्ड पुळेकर, जाधव, महाडिक यांनी या रुग्णांना सुखरूप मनोरुग्णालयात नेण्याची जबाबदारी पार पाडली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*