दापोली : गावतळेत घरफोडी, 41 हजाराचा ऐवज लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यातील गावतळे- दत्तवाडी येथून बंद घर फोडून सुमारे ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ६:४५ ते ८.३० वाजण्याच्या मुदतीत घडली.

याबाबत मूळचे गावतळे- दत्तवाडी येथील स्नेहल हरिश्चंद्र पवार (२६, रा. अल्टिमो अपार्टमेंट, शंकर कळत नगर, वाकड, पुणे.) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी संध्याकाळी ६.४५ ते ८.३० वाजण्याच्या मुदतीत त्यांच्या घरामध्ये कोणी नसताना बंद घराचा कडीकोंडा व कुलूप अज्ञाताने तोडले.

कुलूप तोडून बेडरूममध्ये ठेवलेला सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा एचपी कंपनीचा एचपी प्रो बुक इंटेल कोअर आय ५ लॅपटॉप व चार्जर, सुमारे १५०० रुपये किंमतीचे रियलमीचे इयरफोन व नॉईजचे इयर बर्ड, तसेच आयसीआयसीआय व एसबीआय कंपनीचे डेबिट कार्ड, रुपे कार्ड व क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा सर्व कागदपत्रांसहित ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला.

अज्ञात इसमाच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *