दापोलीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘अबोली वीक’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर जेसीआय दापोली यांच्या वतीने “दापोली खाद्यसम्राज्ञी” या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमधील पाककौशल्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता दापोली येथील ‘स्वाद मराठी’ रेस्टॉरंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विविध पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थ सादर करून महिलांना आपले पाककौशल्य दाखवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक गृहोपयोगी तसेच स्वयंपाकघरातील उपयुक्त भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे महिलांमध्ये स्पर्धात्मकता वाढून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी रोशन वेदक, प्रकल्प संचालक जेसी महेंद्र खैरे आणि प्रकल्प समन्वयक जेसी अनिकेत खानविलकर हे प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क :
जेसी अनिकेत खानविलकर – 7709997119

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














