दापोली : पुढील 3 ते 4 तासात दापोली तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत होणार

banner 468x60

दापोली तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून लाईट नसल्याने नागरिकांच्या अक्षरशः हाल झाले आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असल्यामुळे आणि तांत्रिक कामामुळे गेल्या 2 दिवसापासून तर काही गावात 3 दिवसापासून लाईटचा पत्ता नाहीय.

मात्र अखेर जवळपास काम पूर्ण झाला आहे. दापोलीला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीतील बिघाड दूर झाला असून महावितरणच्या काळकाई कोंड कार्यालयापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला आहे.

उर्वरित गावांचा पुढील दोन ते तीन तासात टप्प्याटप्प्याने सर्व गावातील वीजपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती दापोली महावितरण कार्यालयाने दिली आहे.


आपल्या भागात लाईट नसल्यास आपण कोकण कट्टा न्यूजला संपर्क करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *