दापोली : दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील जोगळे खोडा पाटीलवाडी येथे दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १ मार्च) रात्री उशिरा घडली. मॅनूद्दीन मेहबूब मुल्ला (वय ३०, मूळ रा. यादगिरी, कर्नाटक; सध्या रा. खोडा, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

banner 728x90 banner 728x90

तो रविवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी (क्र. MH 08 AH 3850) घेऊन जोगळे खोडा पाटीलवाडी येथील सिमेंट रस्त्यावरून जात होता. किरण भंडारी यांच्या घरासमोरून जात असताना अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक किरण भंडारी यांनी जखमी अवस्थेतील मॅनूद्दीन याला आपल्या रिक्षातून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री ११.५० वाजता त्याला मृत घोषित केले.


या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २ मार्च) पहाटे १.४१ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे. कामानिमित्त दापोलीत वास्तव्यास असलेल्या या तरुणाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *