दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. भीमराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन ( इंडिया) या पुणे येथे 1936 साली स्थापन झालेल्या ख्यातनाम संस्थेतर्फे डॉ. पाटील ह्यांनी गेल्या 40 वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कृषी सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा गौरव केला गेला. पुण्याच्या जे. डब्लू. मारियट हॉटेलमध्ये 24 ऑगस्ट रोजी आयोजित संस्थेच्या वार्षिंक अधिवेशनात हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. पाटील ह्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान या विषयावर सादरीकरण केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















