दापोली : प्रभागस्तरीय क्रीडास्पर्धा संपन्न

banner 468x60

दापोली- पंचायत समिती दापोली अंतर्गत दापोली शिक्षण प्रभागस्तरीय वार्षिक हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच दापोली तालुक्यातील ताडील सुरा येथील श्री महामाई देवी क्रीडानगरीत पार पडल्या.

banner 728x90

दोन दिवस चाललेल्या या क्रीडास्पर्धांच्या अध्यक्षस्थानी गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले होते. दापोली शिक्षण प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे यांच्या हस्ते या दोन दिवशीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात दापोली प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, लंगडी यांसारख्या सांघिक क्रीडाप्रकारांबरोबरच धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळीफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या.

दापोली प्रभागातील ताडील सुरा केंद्रामार्फत या दापोली प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजयी संघ व खेळाडूंना दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे,

ताडील सुरा व आसूद केंद्रप्रमुख गुलाबराव गावीत, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, हर्णे उर्दु केंद्रप्रमुख जलील ऐनरकर, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, बांधतिवरे सरपंच दत्ताराम साळवी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

क्रीडास्पर्धेसाठीच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन संतोष सकपाळ, शशिकांत शेळके यांनी केले, तर ताडील सुरा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक विनोद गिम्हवणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *