दापोली : दशनेमा गुजर युवक संघटना दापोली आणि जे.सी.आय. दापोली यांच्यावतीने पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

banner 468x60

दशनेमा गुजर युवक संघटना दापोली व जे.सी.आय. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील घडामोडी निःपक्षपातीपणे मांडणाऱ्या व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Screenshot

banner 728x90

या सोहळ्यात पत्रकारांना सन्मानचिन्ह व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येकी एक फळझाड देऊन गौरव करण्यात आला. निःपक्ष, निर्भीड व समाजोपयोगी पत्रकारितेद्वारे समाजजागृती करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी पत्रकार समाजाचा आरसा असल्याचे नमूद केले. सामाजिक प्रश्न, लोकांच्या समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करत असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास जे.सी.आय. दापोलीचे अध्यक्ष फराज रखांगे, नूतन अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्यासह अतुल गोंदकर, तेजस मेहता, ऋषिकेश तलाठी, मयुरेश शेठ, निकेत मेहता, स्वप्निल मेहता, रोशन वेदक, ऋषिकेश शेठ, कुणाल मंडलिक, अरुण गांधी तसेच जे.सी.आय. दापोली व दशनेमा गुजर युवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दापोली परिसरातील पत्रकार व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम शांत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *