दापोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विरेश्वर विद्यालय विरसई दापोली तालुक्यात द्वितीय

banner 468x60

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियानात विरसई जनसेवा मंडळ संचालित विरेश्वर विद्यालय विरसई या विद्यालयाने दापोली तालुक्यातील

माध्यमिक शाळा या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून दोन लाख रुपये बक्षीसाचे मानकरी ठरले आहे. दि. ५ ऑगस्ट २०२४ ते दि. ३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेले ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’

या अभियाना अंतर्गत केंद्र व तालुका स्तरावरील सहभागी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये माध्यमिक शाळा गटातून कांगवई केंद्रातून प्रथम व दापोली तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचे मानकरी विरेश्वर विद्यालय ठरले आहे.

विरेश्वर विद्यालय विरसईने मागील २८ वर्षात केलेले उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, शिष्यवृत्ती परीक्षा या बरोबरच लोकसहभागातून पायाभूत सुविधांची केलेली पूर्तता, शैक्षणिक परिसराची निर्मिती, पर्यावरण रक्षण व परसबाग निर्मिती, सुसज्ज क्रीडांगण, स्वच्छतागृह, शासकीय योजना व उपक्रमांची अंमलबजावणी इ. निकषांचा विचार मूल्यांकनामध्ये करण्यात आला होता.

यासाठी शालेय समिती चेअरमन अनिल पिंपळकर, सदस्य सुनिल राणे यांनी सतत प्रेरणा दिली. तसेच गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी लहांगे, केंद्रप्रमुख श्रीकांत बापट, दिनकर क्षीरसागर, धनंजय शिरसाट यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले.

या अभियानातील शाळेच्या सहभाग व यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक सुनील गोरीवले यांनी परिश्रम घेतले.

विद्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल विरसई जनसेवा मंडळातर्फे अध्यक्ष नंदकुमार धोत्रे, उपाध्यक्ष विठ्ठल माने, सचिव सुरेश बेटकर, उपसचिव संदीप राणे, खजिनदार राजेश राणे, ग्रामीण अध्यक्ष कृष्णा राणे, सरपंच मनोरमा राणे, उपसरपंच विद्यार्थ जाधव, महिला मंडळ अध्यक्ष सुनिता जाधव सचिव सारीका राणे माजी अध्यक्ष हरी राणे, विरसईतील प्रतिष्ठीत नागरिक गणपत भुवड, सहदेव जाधव, संजय पिंपळकर, सुलोचना राणे, दिलीप राणे, सुरेश वडतकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विरसई जनसेवा मंडळाचे पदाधिकारी व पालक वर्ग, माजी विद्यार्थी संघटना,

शालेय व्यवस्थापन समिती व अन्य शालेय समित्या यांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *