दापोली : केळशीत BASNL चा नेटवर्क नाही, खाजगी कंपनीच्या खोदकामात केबल तुटल्याने नेटवर्कचा प्रश्न

banner 468x60

केळशी पंचक्रोशीत बीएसएनएलच्या केबल
खाजगी कंपनीच्या खोदकामात तुटत असल्याने मोठा नेटवर्कचा प्रश्न निर्माण झाला असून याचा मोठा फटका शेतकरी, विद्यार्थी वर्गाला बसत असल्याने येथे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

banner 728x90


एअरटेलच्या फायबर केबल कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटत असून यामुळे केळशी पंचक्रोशीत नेटवर्कचा पूर्ण बोजवारा उडला असल्याचे येथील बीएसएनएल ग्राहकांनी स्पष्ट केले आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होणार असल्याचे दिसत आहे.


दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीत बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध असते. त्यामुळे येथे या कंपनीचे ग्राहकांची संख्या मोठी आहे. शासकीय आस्थापना, बँका आदींमध्ये बीएसएनएल लाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार, बँकिंग आदी सर्वच बाबींवर या नेटवर्क इश्यूचा विपरीत परिणाम होत आहे.

विद्यार्थी वर्गाला ऐनपरीक्षा कालावधीत याचा सामना करावा लागत आहे. मात्र बीएसनएनएलने अद्यापही आपल्या के बल तुटण्याच्या कारणाची गांर्भीर्याने दखल घेतली नसल्याचे येथील ग्राहकांचे म्हणणे आहे.

दरम्यान यामुळे विद्यार्थी वर्गासह व्यापारी, शेतकरी वर्ग आणि विविध योजनांचे लाभार्थी अडचणीत आले असून लवकरच याबात रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समजते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *