दापोली : गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था बॅंकेचे सर्व्हर डाउन असल्याने ग्राहक हैराण

banner 468x60

दापोली शहरातील गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था दापोलीच्या कार्यालयाचा सर्वर आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी बँक उघडल्यापासून संध्याकाळी बंद होईपर्यंत सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प होते. त्यामुळे ग्राहक चांगलेच हैराण झाले.


ग्राहकांना पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी अडचणी येत होत्या.व्यवहार करण्यासाठी कोणतीही उपायोजना करण्यात न आली असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरलं होतं.

banner 728x90


सर्व्हर डाऊन झाल्याने ग्राहकांना आपल्या अत्यावश्यक कामासाठी खात्यात पैसे असूनही काढता येत नसल्याने ग्राहक पतसंस्थेच्या कारभारावर हैराण झाले होते.

पतसंस्थेने आपल्या ग्राहकांवर विश्वास दाखवणे गरजेचे होते कारण पतसंस्थेच्या अडचणीच्या काळात याच ग्राहकाने बँकेवर विश्वास दाखवला होता.


पतसंस्थेने ऑफलाईन पद्धतीने तरी ग्राहकांना काही रक्कम द्यायला हवी होती असं अनेक ग्राहकांचं म्हणणं होतं.
यापुढे तरी गोपाळकृष्ण बँकेने आपल्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी दापोलीतील बँकेच्या ग्राहकांनी केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *