दापोली : आसऱ्याच्या पुलावर वाहनाची दोन विद्यार्थ्यांनीना धडक

banner 468x60

दापोली शहरातील आसऱ्याच्या पुलावर शनिवारी सायंकाळी अपघात झाला आहे. या अपघातात रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन २० वर्षीय विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालत जात असताना मागील बाजूने वेगाने येणाऱ्या पुणे येथील पर्यटकांच्या गाडीने त्यांना धडक दिली.

यात दोन्ही विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *