दापोली : अखेर मुहूर्त ठरला, आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत संजय कदम करणार शिवसेनेत प्रवेश, कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब

Screenshot

banner 468x60

विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने संजय कदम यांचा पराभव झाल्यानंतर संजय कदम यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याची चर्चा दापोली मतदारसंघामध्ये सुरु होती.

banner 728x90

त्यानंतर काही दिवसांपासून संजय कदम हे शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर दापोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला असताना माजी आमदार संजय कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली.

या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळाली आणि आज अखेर मुहूर्त ठरला असून आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत संजय कदम संध्यकाळी साधारण 3 ते 4 च्या दरम्यान मुंबई येथील मरीन लाईन जवळील शिवसेना कार्यलयात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी संजय कदम यांची याबाबतची प्रतिक्रिया घेतली यावेळी अगदी मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली थोड्याच दिवसात समजेल अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली.

आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

संजय कदम आणि रामदास कदम आज अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. संजय कदम यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानं रामदास कदम आणि त्यांच्यातील वाद मिटणार आहे.

सध्या कोकणचा विचार करता ठाकरेंकडे भास्कर जाधव सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही. त्यामुळे संजय कदमांच्या प्रवेशाने योगेश कदमांसमोर प्रतिआव्हान देण्यासाठी कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *