दापोली : अडखळ-जुईकर मोहल्ल्यात स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय

banner 468x60

दापोली तालुक्यातील अडखळ तरीबंदर ते इरफानिया आणि जुईकर मोहल्ला यादरम्यानचे स्ट्रीट लाईट नसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

banner 728x90

समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या अडखळ गावातून जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद आहे. वाहतुकीसाठी सुद्धा खूप मोठी अडचण निर्माण होते. अशातच स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता आहे. अडखळ गावातील येणारे जाणारे रहिवासी अंधारातून गावात जाताना चाचपडत जावे लागत आहे.

त्यामुळे गावातील लहान मुलांना गावात फिरणे कठिण झालंय. गावाची ही अडचण लक्षात घेऊन अडखळ गावातील सामाजिक कार्यकर्ते जहूरभाई कोंडविलकर यांनी कनिष्ठ अभियंता शाखा कार्यालय हर्णे यांच्याकडे त्वरित

रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करावेत आणि लोकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते जहूरभाई कोंडविलकर यांच्या मागणीकडे कनिष्ठ अभियंता शाखा कार्यालय हर्णे हे कधी लक्ष देणार हे पाहावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *