दापोली : अडखळ सरपंच रविंद्र घाग यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश, रउफ काझी यांची सरशी, सरपंच आणि उपसरपंचांच्या संघर्ष 3 वर्षांनंतर संपुष्टात

banner 468x60

दापोली तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच परस्परांना अपात्र ठरविण्यासाठी संघर्ष करत होते. या कायदेशीर लढाईत उपसरपंच रऊफ काझी यांची सरशी झाली आहे.

banner 728x90


सरपंच रविंद्र घाग यांना कोकण विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. या पूर्वी सरपंचांनी उपसरपंच काझी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे अडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांमधील गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.


सरपंच रविंद्र घाग आणि उपसरपंच रऊफ काझी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून जोरदार राजकीय संघर्ष सुरु होता. सरपंच मनमानी कारभार करतात, विविध दाखले देण्याचे ग्रामसेवकाचे अधिकार डावलून स्वतः च्या अधिकारात दाखले देतात. याबाबत उपसरपंच रउफ काझी व अन्य चार सदस्य यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.

गावातील अकबर काझी यांनी सरपंच रवींद्र घाग यांच्याकडे वाळूसाठा करण्याकरिता रॉयल्टी भरण्यासाठी दाखला मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. ग्रामपंचायत विभागातील शासन परिपत्रकानुसार महसूल व वनविभाग व कृषी परवानगी व बांधकामास मान्यता घेण्याकरिता गौण खनिज

उत्खननाची परवानगी देण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीमध्ये नवीन उद्योग स्थापन करत असेल किंवा कार्य किंवा सध्या असलेल्या उद्योगाचा विस्तार करण्यात येत असेल तेव्हा असे उद्योग उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही नमूद करण्यात आलेली आहे.


ग्रामपंचायतीकडून द्यायचे ना हरकत प्रमाणपत्र हे ग्रामपंचायतीच्या मान्यतेने ग्राम सचिवाच्या स्वाक्षरीने देणे गरजेचे असते. असे असतानाही सरपंच रवींद्र घाग यांनी अकबर काझी यांना मासिक सभेची मान्यता न घेता स्वतःच्या स्वाक्षरीने दाखला दिल्याचे निदर्शनात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या निरीक्षणात म्हटले आहे.

सदर वस्तूस्थिती लक्षात घेता रवींद्र घाग यांनी शासन परिपत्रक तरतुदीचे उल्लंघन केले आहे. यामुळे रवींद्र घाग यांनी याप्रकरणी प्रशासकीय अनियमितता केली असून आर्थिक अनियमितता केलेली दिसून येत असल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.


रवींद्र घाग हे दापोली तालुक्यातील एका राजकीय पक्षाचे वजनदार नेते आहेत. शिवाय ते एका समाजाचे प्रतिनिधित्व देखील करतात. यामुळे त्यांच्या गच्छंतीने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *