दापोली 2 मुलींची छेडछाड प्रकरण : अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

banner 468x60

दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
दापोलीत अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दापोलीमध्ये अलीकडेच अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना ताजी असताना
दापोलीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत संतापजनक घटना घडली आहे.

धक्कादायक म्हणजे एकाच मुलाने दोन मुलींची छेड काढली आहे. 4 जानेवारीला एका २४ वर्षीय मुलीची अश्लील हात लावून छेड काढणे आणि ६ तारखेला याच मुलाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली आहे.

व्हॉट्सअप लिंक जॉइन कोकण कट्टा न्यूज

https://chat.whatsapp.com/EiURB5jdIG36LRcTI6NMi3

मात्र या दोन्ही घटनांमध्ये मुलगा तोच असून छेड काढण्याच ठिकाण देखील तेच आहे. दापोली पोलीस स्थानकात या बाबत कलम 75(2)78(2)पोक्सो 8,12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करित आहेत. संतत्प नागरिकांनी गुन्हेगाराला कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

सदर तरुण हे भिन्न धर्मीय असल्याने मुली मात्र एकाच धर्माच्या असल्याने सध्या दापोलीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का अशी चर्चा आहे. आम्ही बातमी देताना देखील संयुक्तिक गोष्टी देवून सांगत आहोत कारण यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही विशिष्ठ धर्माचं नाव घेणं टाळत आहोत.

कारण दापोलीत मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्यात का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अश्या घटना का घडतात शांत दापोलीला पुन्हा एकदा पेटवायचं आहे का असाही प्रश्न अश्या घटनांवरून समोर येऊ लागलं आहे. दोन्ही घटना सविस्तर समजावून घेवू पहिली

घटना घडते ४ तारखेला ठिकाण आहे नर्सरी रोड दापोली मुलीचं वय-24 वर्ष व्यवसाय नोकरी

दिनांक 04/01/2025 रोजी मी रात्री 08.30 वाजता कामावरुन सुटुन एकटीच पायी चालत नर्सरी रोडने घरी जात असताना रात्री 08.45 च्या दरम्याने मी नर्सरी रोड वरील इदमाह (हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट गेट अलीकडे) आले असता समोरुन दुचाकी वरून एक इसम सैतवडेकर ज्वेलर्सकडे जाताना मला दिसला. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असताना ती दुचाकी पुन्हा माझ्या मागुन आली व मी त्या रस्त्याने चालत जात असताना त्यांनी माझ्या मागे येऊन माझ्या उजव्या कंबरेच्या खालील बाजुस हाताने दाबले. यावेळी मला लाज वाटल्याने मी त्याचा हात झटकुन त्याला बाजुला केले.

यावेळी तो गाडीवरून पुढे निघुन गेला. नंतर मी घाबरुन, आहे तिथेच थांबून राहिले, येथुन येणारी एक तोंड ओळखीची महिला मला दिसली त्यांच्याकडुन मी मदत मागीतली तसेच त्यांनी मला माझ्या घरी नेऊन सोडले. मी घरी गेल्या नंतर सदरचा सर्व प्रकार माझ्या आईला सांगितला, माझे वडील रत्नागिरीला गेलेले असल्याने ते रात्री 12.00 वाजताच्या दरम्यान घरी आल्या नंतर त्यांना माझ्या बरोबर घडलेला सर्व प्रकार मी सांगितला.

मात्र मी घाबरुन माझी मानसीक स्थिती नसल्याने आज पर्यंत मी तक्रार दिलेली नव्हती. परंतु आज दिनांक 07/01/2025 रोजी मला दापोली शहरातील एका मुलीची दुचाकीवरुन येऊन एका व्यक्तीने छेड काढल्याने एका युवकावर गुन्हा दाखल केला असल्याचे समजले म्हणून मी वडीलांजवळ चर्चा करुन आपण देखील गुन्हा दाखल करु,

असा निर्णय घेतला माझे वडील असे आम्ही दापोली पोलीस ठाणे गेलो असता पोलीसांसमोर एक व्यक्ती उभा असल्याचे मी पाहिले असता दिनांक 04/01/2025 रोजी नर्सरी रोड येथे माझ्या अंगाला हात लावलेला व्यक्ती तोच असल्याची माझी खात्री झाली त्यावरून त्या व्यक्तीचे नावाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव…. असल्याचे मला समजले असुन याच व्यक्तीने माझ्या मनाल लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याने माझी त्याच्या विरुध्द कायदेशीर तक्रार आहे.

ही घटना झाली पहिली आता घटना दुसरी पाहूयात ६ जानेवारीला याच मुलाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली ठिकाण किसानभवन चंद्रनगर दापोली मुलीचं वय-१५ वर्ष शाळेत शिशान ( या घटनेबाबत कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी मुलीच्या वडिलांजवळ सविस्तर चर्चा करुन ही माहिती देत आहोत)

अल्पवयीन मुलगी ही शाळेत शिकत आहे. दररोज सायकलने ती शाळेत जाते. 6 जानेवारीला दुपारी १२.३० वाजता


आरोपीने मुलगी शाळेतून घरी जात असतांना बाईकने पाठलाग केला मुलीला भर रस्त्यात थांबवून माझ्याशी फ्रेंडशीप कर असे बोलून तिचा हात पकडला मुलगा एवढ्यावरच न थांबता त्याने मुलीची मान पकडली आणि जवळ ओढून वाईट हेतूने मुलीच्या अंगाला हात लावला तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्यासारखा वागला सदर पीडित मुलीने आरडा ओरड केल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पसार झाले.

यावेळी बाईकवर दोन मुळं होती

दापोली शहरात अल्पवयीन मुलाकडून छेडछाड झाल्याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने दापोली पोलीस स्थानकात केली आहे.

यामधील छेडछाड करणारा हा अल्पवयीन आहे.
यानंतर दापोली पोलिसांनी दखलपात्र गुन्हा रजि नं-10/2025 बी.एन.एस कलम 75(2), 78 (2), पोक्सो 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा गुन्हा रजि दाखल करुन गुन्ह्याचा तपास पोउनि. गंगधर यांचेकडे देण्यात आलेला आहे.

तरुण हा भिन्न धर्मीय असल्याने दापोली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होतं मात्र आता तणावपूर्ण शांतता आहे.
दापोली पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे शांतता प्रस्थापित

करण्यात यश आलं आहे. या प्रकरणामुळे दापोलीतील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरीहुन तातडीने राखीव दलाचे सुमारे ३० पोलिसांच्या तुकडीला दापोलीत बोलविण्यात आले आहे.

दापोलीत या प्रकरणामुळे कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग होणार नाही याची खबरदारी दापोली पोलिसांकडून घेतली जात असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. मात्र अश्या घटनांमुळे दापोलीची शांतता भंग का होत आहे हा प्रश्न आहे . दापोलीत अल्पवयीन मुलीदेखील सुरक्षित नाहीत का असा प्रश्नसध्या दापोलीकरांच्या मनात आहे.

Report By – Tejas Borghare with Salim Rakhange, Dapoli

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *