दाभोळ : दुःखद ! दाभोळचे प्रसिद्ध व्यापारी नरोत्तम गुजर यांचं वृध्दपकाळाने निधन

आठवणीत राहणारे भाई (दुःखद दाभोळचे प्रसिद्ध व्यापारी नरोत्तम गुजर यांचं वृध्दपकाळाने निधन)

banner 468x60

दाभोळचे प्रसिद्ध व्यापारी नरोत्तम मथुरदास गुजर यांचं दाभोळमध्ये राहत्या घरी वयाच्या 82 व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झालंय.

काही महिन्यापासून ते आजारी होते आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. व्यापारा बरोबरच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. भाईंचा स्वभाव हा नेहमी प्रेमळ आणि त्यांच्या बोलण्यात नेहमी आपुलकी असायची.

दाभोळमध्ये त्यांना सर्वजण प्रेमाने भाई म्हणत. मुंबईमध्ये काही वर्ष सर्विस करून भाई अखेर गावच्या व्यवसायात रमले. भेट झाली की मुंबई आणि गाव यामधला फरक नेहमी समजावून
सांगायचे.

भाईंजवळचा संवाद नेहमी आठवणीत राहिला. रागाने कधी कोणाजवळ बोलले असं कधीही आठवत नाही आणि जरी बोलले तरी त्या रागात आपसूक प्रेम, काळजी असायची.

येणाऱ्या ग्राहकांजवळ देखील त्यांचा संवाद नेहमी प्रेमळ असायचा. दररोज देवपूजा अगदी न विसरता असायची
त्यांच्या कामाची सुरुवातच देवपूजेने असायची. दुकानातून येता जाता सर्वजण भाईंना आवाज देऊन जायचे.तब्येत बरी नसल्याने कधीतरी दुकानात बसत.

आता मात्र भाई नाहीत रिकामी असणारी खुर्ची नेहमी भाईंची आठवण करुन देईल. भाईंची अंत्ययात्रा उद्या 5 ऑगस्ट सकाळी 8 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.कोकण कट्टा न्यूजकडून भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली, दाभोळ व्यापारी संघटनेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *