एसटीने आपण प्रवास करत असताना एसटीचे ड्राइव्हर आणि कंडक्टरची अरेरावी ही काही प्रवाश्याना नवीन नाही चालक आणि वाहकांची दादागिरी जणूकाही एसटी बस आपलीच आहे अशी वागणूक असते. मात्र आता यामध्ये एका महिलेची भर पडली आहे.
या कंडक्टरना ड्राइव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून गप्पा मारण्याचा सध्या प्रकार वाढू लागले आहेत. दाभोळमध्ये असाच प्रकार समोर आला आहे.
ज्येष्ठ नागरिकाला तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन तिकीट द्या, तुमच्याकडे कुठे त्यांना बोलावताय असे सांगितल्याचा रागातून महिला कंडक्टरने प्रवाशांच्या कानशिलात मारून शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी दापोली दाभोळ मार्गावर घडली आहे. शनिवारी दुपारी 2.30 वाजता दापोली-दाभोळ बस दाभोळकडे जात असताना बसमध्ये एक प्रवासी चढले त्या प्रवाशाने शंभर रुपये महिला कंडक्टरकडे तिकिट काढण्यासाठी दिले.
महिला कंडक्टरने त्यांना उर्वरित सुट्टे पैसे नंतर घ्या असे सांगितले. यावर तो प्रवासी एका सीटवर जाऊन बसला. यानंतर कंडक्टर चालकाच्या केबिनमध्ये जाऊन शेजारी सीटवर बसली. बस पुढे गेल्यानंतर एक वृध्द नागरिक बसमध्ये चढले.
यावेळी या महिला कंडक्टरने चालकाच्या केबिनमधूनच त्या वृद्ध नागरिकाला इकडे येऊन तिकिट घ्या, असे आदेश सोडले. यावर याआधी तिकिट घेऊन बसलेल्या प्रवाशाने त्या महिला कंडक्टरला केबिनमध्ये जाऊन तुमचे हे वागणे बरोबर नाही, तुम्ही वयोवृद्ध नागरिकाजवळ जाऊन त्याचे तिकिट काढायला पाहिजे असे सांगितले.
याचा राग येऊन या महिला कंडक्टरने या प्रवाशाच्या कानशिलात मारली. शिवाय शिवीगाळ केली. यानंतर हे प्रकरण दाभोळ पोलीस ठाण्यात गेले. दाभोळ पोलीस स्थानकात सदर प्रवाशाची तक्रार लिहून घेण्यात आली. महिला वाहकाला मात्र समज देण्यात आली.
या महीलेविषयी दापोली आगाराकडे चौकशी केली असता ही महिला कंडक्टर विषयी यापूर्वी देखील तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
Response (1)