रत्नागिरी येथील गोवंश हत्या घटना ताजी असताना दाभोळमध्ये गुरांची अवैध वाहतुक करताना एक टेंम्पो पकडण्यात आला आहे.
दाभोळ जवळ असणाऱ्या गावरई बौद्धवाडी येथे गुरांची अवैध वाहतुक करताना एक टेंम्पो पकडण्यात आला आहे. दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन टेंम्पो आणि चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये विकणाऱ्या आणि घेणाऱ्या अश्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दाभोळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मुदस्सर अब्दुल रौफ माखजनकर, राहणार टेटवली मोहल्ला ता दापोली, जि रत्नागिरी आणि सुरेश गणपत मोहिते राहणार बौदधवाडी वळणे ता दापोली दाभोळ सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. न.११/२०२४ व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड.) (च) सह महाराष्ट प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा (सुधारित सन २०१५) चे ५.५(अ), (व), ९ प्राणी वाहतुक नियम १९७८ चे कलम ५८, महाराष्ट कायदा कलम ११९, महा मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
नानटे गावचे नागरिक नरेश मोहिते यांना गुरांची अवैध वाहतुक होत असल्याचा संशय आल्यावरून त्यांनी संशयीत गाडीचा पाठलाग केला आरोपीस थांबवून हटकले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
मोहिते यांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी ही माहीती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून दाभोळ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपीला त्याच्या टाटा इंट्रा (MH 03 DV 9326) या टेंपोसह आपल्या ताब्यात घेतले. यावेळी त्या टेम्पोत एक काळ्या रंगाचा बैल आढळला आहे.
आरोपीत मुदस्सर याने वळणे बौद्धवाडी येथील आरोपी सुरेश मोहिते याने त्याच्याकडील बैल अब्दुल रौफ माखजनकर यास विकुन तो बैल अब्दुल माखजनकर याने त्याच्या ताब्यातील गाडी नं MH 03, DV-9326 मध्ये त्या बैलास वेदना आणि हाल होतील अशा रितीने पुरेशी जागा नसताना सुदधा आखुड दोरीने बांधुन त्या बैलास कत्तल करण्याच्या इराद्याने वाहनातुन घेवुन जात असताना नरेश यांनी पाहिलं आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून दाभोळ पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपीला त्याच्या टाटा इंट्रा (MH 03 DV 9326) या टेंपोसह आपल्या ताब्यात घेतले.
मंगळवारी रात्री 10:15 च्या दरम्यान टेम्पोसहित चालकाला दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणण्यात आले.
मात्र दापोली, गुहागर, मंडणगड, खेड तसेच रत्नागिरी मुख्यालयाचा असा एकूण 60/65 जणांचा पोलीस स्टाफ असतांनाही चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रीचे एक वाजले. यावेळी दाभोळ परिसरातील सुमारे 400 ते 500 ग्रामस्थ पोलीस ठाण्याबाहेर उभे होते. मात्र ही माहिती सर्वत्र पसरल्याने मोठा जमाव दाभोळ पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झालाय, त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यास अडथळा निर्माण झालाय.
यावेळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोईर यांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यात येण्यास मज्जाव केला. या प्रकरणात आणखीही काही जण सामिल असल्याचे बोलले जात आहे, याबाबतीत दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
टीप – दाभोळ : गावरई गुरांची अवैध वाहतूक प्रकरण : घटना झालेला गाव गोमरई नसून गावरई आहे. मात्र आम्ही दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारच गावांचं नाव दिलं होतं. दोन्ही गावांमध्ये साम्य असलेल्याने गोमरई असं झालं होतं. आम्ही पुन्हा एकदा अधिकृत सांगत आहोत घटना गावरई येथे घडली आहे.
©️ 2024 Kokan Katta Live | Media Network
Rg | No | MH | 28-0047569
Editor – Tejas Borghare
Ratnagiri | Dapoli
वेगवान बातमी | अचूक आणि थेट भूमिका |

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*