दाभोळ : ठेकेदार योगेश सुर्वेच्या मुजोरीचा पत्रकाराने केला पर्दाफाश, खड्ड्यांचं निकृष्ट काम, वरून पत्रकारावर अरेरावी कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी मुजोर ठेकेदाराची केली बोलती बंद

banner 468x60

दाभोळमधील रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकतर ठेकेदार योगेश सुर्वे झोपेतून जागे झालेत. दाभोळच्या रस्त्यांवर फक्त आतापर्यंत भोगस काम झाले आहेत आणि याचा प्रत्यय वेळेवेळी दाभोळमध्ये आला आहे.

कितीवेळा रस्ते डागडुजी करणार असा प्रश्न अश्या मुजोर योगेश सुर्वेला पडत नाही का हा संशोधनाचा विषय आहे. आधी या योगेश सुर्वेचा मुजोरपणा पाहूयात …

गणपती विसर्जन झाले आणि या मुजोर ठेकेदाराला आता जाग आलीय. खड्डे बुजवतात म्हणजे मेहरबानी करता का दाभोळमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कररुपी पैश्यातून ही सर्व काम होतात. योगेश सुर्वेकडे बांधकामाचं प्रमाणपत्र नाही दाभोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारे काम देते हा प्रश्न आहे.

आम्ही सविस्तर प्रतिक्रिया घेण्यासाठी सरपंच यांना कॉल केला मात्र प्रतिसाद आला नाही. याबाबत आम्ही दाभोळ ग्रामसेवक जितेंद्र कांबळे यांना संपर्क केला .

दाभोळ परिसरात अजूनही कच्चे रस्ते आहेत, तर काहींचे डांबरीकरण उखडल्याने तेथे मोठे खड्डे पडले आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे. सकाळी केलेलं काम दोन दिवस राहिल की नाही हे ही सांगता येत नाही .

दाभोळच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले असून या भागात राहणाऱ्या नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे. गणपती विसर्जन झाल्यानंतर ठेकेदाराला जाग आलीय.

आज मंगळवार सकाळपासून खड्डे बुजवण्याचं काम दाभोळच्या रस्त्यावर सुरु आहे. कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे या रस्त्याची बातमी करत असताना दाभोळमधील मुजोर ठेकेदार योगेश सुर्वेचा मुजोरपणा पाहायला मिळाला.

योगेश सुर्वेने ये इकडे ये असं म्हटलं तुम्ही चुकीची बातम्या देता मुंबईला राहून बातम्या देता असं पत्रकार तेजस बोरघरे यांना म्हटलं मात्र संपादक तेजस बोरघरे यांनी ही अश्या मुजोर ठेकदाराची बोलती बंद केली आहे.

दाभोळ खड्डे प्रश्नांवर मुजोरीचा पर्दाफाश कोकण कट्टा न्यूजचे संपादक बोरघरे यांनी केला आहे. अश्या अरेरावीच्या भाषेचा आणि अश्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. आणि अश्या टुकार ठेकदारांची आम्ही पोलखोल करतो आता या मुजोर ठेकेदार कोणाच्या जोरावर काम घेतो आणि यालाच सर्व कामं कशी दिली जातात हा प्रश्न आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *