रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी तसेच १७ वी राज्यस्तरीय मिनी सबज्युनियर आर्चरी स्पर्धा रत्नागिरी येथील शिवाजी स्टेडियममध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेत यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमीच्या अनेक खेळाडूंनी विविध गटांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सर्व विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय मिनी सबज्युनियर आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही अकॅडमीसाठी अभिमानास्पद बाब आहे. याच स्पर्धेत दाभोळ येथील अन्वी विदेश दाभोळकर हिने मिनी सबज्युनियर गटात अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ करत उल्लेखनीय यश मिळवले. तिच्या अचूक नेमबाजीने परीक्षक व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशामुळे दाभोळ परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.

अन्वीच्या या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक, पालक, तसेच यशवंत स्पोर्ट्स आर्चरी अकॅडमीच्या सर्व प्रशिक्षकांनी तिचे कौतुक केले आहे. भविष्यातही ती राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच अन्वी विदेश दाभोळकरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















