दाभोळ : त्रिशा दाभोळकरला नॅशनल कॉम्पिटिशन कराटे स्पर्धेत सिल्वर आणि कांस्य मेडल

banner 468x60

दाभोळची कन्या त्रिशा दिनेश दाभोळकर हिने मुंबईतील अंधेरी येथे पार पडलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एक सिल्वर (रौप्य) आणि एक कांस्य पदक पटकावले.

Whatsap link kokan katta news join https://chat.whatsapp.com/Hi840bMY484LLZFGy9vurA?mode=ems_copy_c

banner 728x90

त्रिशा ही प्रभास कराटे स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थीनी असून, सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. मात्र तिचे मूळ गाव दाभोळमधील कुंभारवाडी आहे. तिने विविध राज्यांतील स्पर्धकांशी झुंज देत हे पदक मिळवले.

मुंबईतील अंधेरी येथे पार पडलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन कराटे स्पर्धेत आपल्या कौशल्याने रौप्य (सिल्वर) आणि कांस्य (ब्रॉन्झ) पदकांची कमाई केली आहे. तिच्या या यशामुळे दाभोळसह मुंबईतील कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

स्थानिक आणि राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये तीने याआधीही उल्लेखनीय कामगिरी केली असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.

त्रिशा ही प्रभास कराटे स्पोर्ट्स अकॅडमीत प्रशिक्षण घेत असून, तिने विविध जिल्ह्यातील स्पर्धकांमध्ये आपली चमक दाखवत हे पदक जिंकले. त्रिशाचा हा संपूर्ण प्रवास, जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे.

स्थानिक आणि राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये तीने याआधीही उल्लेखनीय कामगिरी केली असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.त्रिशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *