दाभोळ : साईड देण्यावरून वाद, दोन डंपरच्या मधोमध चिरडून एकाचा मृत्यू, एका विरोधात गुन्हा दाखल, अवैध वाळू उपश्याचा प्रश्न गंभीर

banner 468x60

दाभोळजवळील मौजे आगरवायंगणी बौद्धवाडी फाटा येथे
6 मार्च गुरुवारी रात्री 10:15 च्या दरम्यान दोन डंपरच्या मधोमध चिरडून एकाचा मृत्यू झाला आहे. डंपर चालक दिलीप गंगाराम निवणकर वय 39 वर्ष रा. वणैशी तर्फे पंचनदी दहातोंडीवाडी यांचा मृत्यू झाला आहे.


banner 728x90

whatsap join Link- kokan katta news 👇🏻👇🏻

https://chat.whatsapp.com/IaVL3jL1ZkCEwR0rxAPxA7

या प्रकरणी डंपर चालक हृषीकेश सुरेंद्र बारे विरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

दापोली तालुक्यात सुरू असलेल्या वाळू “माफियाराज” याचं दापोली, दाभोळमध्ये अशा वेगवेगळ्या तालुक्यात वाळू उत्खनन करून खुलेआम वाहतुक केली जाते. या वाळू माफियांवर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू माफियांना पाठीशी घालणारे अधिकारी व विविध विभागातील अधिकाऱ्यांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई का करत नाही?

वाळू तस्करांचा बीमोड होण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत खुलेआम वाळू उपसा सुरू आहे, खुलेआम पद्धतीने दिवसरात्र अवैध वाळू उपसा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाने दिलेत का? असा सवाल वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्तानुसार दिलीप गंगाराम निवणकर हे 6 तारखेला रात्री त्यांच्या ताब्यातील डंपर क्रमांक एमएच.०८. एपी.२७८५ मधून पन्हाळेकाझी येथून वाळू भरून वणौशी येथे चालले होते. त्यांचे सोबत संदेश किसन येलवे हेही डंपरमध्ये होते. ते रात्री ११.१५ चे सुमारास आगरवायंगणी बौद्धवाडीजवळ आले असता समोरून डंपर क्रमांक एमएच.०८. एपी.१५३८ भरधाव वेगाने येत होता.

म्हणून मृत झालेल्या निवणकर यांनी त्यांचा डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवला आणि ते खाली उतरले. समोरून येणाऱ्या डंपरचा चालक हृषीकेश सुरेंद्र बारे याला माझ्या गाडीमध्ये लोड आहे तुझी गाडी रस्त्याच्या बाजूला थोडी खाली उतरव असे निवणकर याने बारे याला सांगितले. निवणकर हे बारे याला बाजूने जाण्यासाठी साईड सांगत असताना बारे यांनी त्यांच्या ताब्यातील डंपर वेगाने चालवून तो बाजूने नेत असताना दोन डंपरच्या मधोमध असलेले निवणकर हे डंपरच्या मधोमध चिरडले गेले.

यामध्ये अतिरक्तस्त्राव झाल्याने निवणकर याचा जागीच मृत्यू झाल्याची तक्रार संदेश येलवे यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संशयित हृषीकेश सुरेंद्र बारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या सर्व प्रकरणा बाबत कोकण कट्टा न्यूजने सविस्तर तपशील जाणून घेतले असता
दिलीप गंगाराम निवणकर याने आगरवायंगणी बौध्दवाडी येथे चिरेखाणीवर काम करीत असताना संदेश येलवे
याने 7 वाजताच्या दरम्याने खाणीवरील मशीन बंद करून पाणी पिण्यासाठी दिलीप गंगाराम निवणकर यांनी हाक मारून खाणीतुन वरती बोलवले म्हणुन संदेश येलवे व प्रणय महादेव येलवे असे बाहेर आले मालक दिलीप गंगाराम निवणकर यांना काय काम आहे

असे विचारले असता. त्यानी आपल्याला बाहेर जायचे आहे डंपरमध्ये बसा असे सांगतल्याने संदेश येलवे व सोबत प्रणय महादेव येलवे असे त्याच्या सोबत डंपरमध्ये बसले व सदरचा डंपर मालक दिलीप गंगाराम निवणकर यांनी स्वतः चालवीत घेवुन पन्हाळेकाझी येथे गेले व तेथे असलेली वाळु जेसीबीने डंपर मध्ये भरून सदर डंपर क्र. MH 08-AP-2785 मालक दिलीप गंगाराम निवणकर हे स्वतः चालवीत पन्हाळेकाझी ते वणौशी जाणारे रोडने चालवत घेवुन येत असताना मौजे आगरवायंगणी बौध्दवाडी फाटा चे पुढे आलो असता समोरून येणारा डंपर गाड़ी क्रमांक MH08-AP-1538 हा भरधाव वेगाने येताना

दिसला म्हणुन मालक दिलीप गंगाराम निवणकर यांनी आमच्या डंपरचा वेग कमी केला. आम्ही डंपरमध्ये डावे साईटला थाबवुन खाली उतरले व समोरून येणारा डंपर वरील चालक ऋशीकेश बारे याला माझे गाडीमध्ये लोड

आहे तुझी गाडी रस्त्याचे साईटला थोडी खाली उतरव असे सांगुन साईट दाखवत असताना ऋशीकेश बारे यांनी त्याचे ताबेतील डपर क्र. MH08-AP-1538 हा वेगाने चालवुन साईट मारून नेत असताना मालक दिलीप गंगाराम निवणकर हे डंपर शेजारी उभे असताना ऋशीकेश बारे याच्या ताब्यातील डपर क्रमांक MH08-AP-1538 व मालकाचा डंपर क्र. MH 08-AP-2785 यामध्ये ०६/०३/२०२५ रोजी २२.१५ वाजता धडक बसुन मालक दिलीप गंगाराम निवणकर हे मध्येच चिरडले गेले त्यामुळे त्याना दुखापत होवुन अती रक्तस्त्राव होवुन ते मयत झालेले आहेत.

ही सर्व फिर्याद संदेश येलवे याची आहे. या सर्वाबाबत
अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *