दाभोळ : ‘रिडले’ कासवांची सर्वाधिक अंडी, दाभोळमध्ये 190 घरट्यांमध्ये 17,495 अंडी, कासवांसाठी दाभोळ सुरक्षित बीच

banner 468x60

काही वर्षांपूर्वी समुद्री कासवांची संख्या कमी, झाली होती. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव बचाव मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे फलित म्हणून आता ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दापोलीत यावर्षी मिळून आलेल्या कासवाच्या घरट्यांवरून व अंड्यांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

banner 728x90

यामध्ये सर्वात जास्त आणि सुरक्षित बीच, समुद्रकिनारा म्हणून दाभोळचं नाव समोर आलं आहे. कारण भोळमध्ये 190 घरट्यांमध्ये 17,495 अंडी सापडली आहेत. दाभोळमध्ये सर्वाधिक कासवांची पिल्ले समुद्रात झेपावत असून ही बाब दाभोळ गावासाठी महत्तव्यपूर्ण आहे.

दाभोळ बीचवर कासव आणि घरटी बनवण्याचं प्रमाण वाढेलेलं असून कासवांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळू लागलं आहे.


दापोली तालुक्यात यावर्षी 409 घरट्यांमध्ये 42 हजार 744 अंडी संरक्षित करण्यात आली. या अंड्यांमधून 4,804 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आल्याची मातिही कांदवण विभागाकडून प्राप्त झाली आहे.

आता दररोज पिल्ले अंड्यांतून बाहेर येत असून त्यानुसार त्यांना समुद्राच्या प्रवाहात सोडण्याचे काम कासवमित्र करीत आहेत. यावर्षी लाडघरमध्ये 31 घरट्यांमध्ये 3,477, दाभोळमध्ये 188 घरट्यांमध्ये 17,495, कोळथरेत 59 घरट्यांमध्ये 6133, केळशीतील 38 घरट्यांमध्ये 3,992, आंजर्लेत 43 घरट्यांमध्ये 6,490, मुरुडमध्ये 33 घरट्यांमध्ये 3,372, तर कर्दे येथील 17 घरट्यांमध्ये 1,785 अंडी सापडली.

प्रत्येक घरट्यात 100 किंवा त्यापेक्षा अधिक अंडी असतात. त्यामुळे यावर्षी सापडलेल्या अंड्यांमधून सर्वाधिक पिल्ले बाहेर येऊन समुद्री कासवांच्या संख्येत वाढ होणार आहे. प्रथम दापोली तालुक्यात सर्वाधिक अंडी सापडल्याचे समोर आले आहे. यामुळे निसर्गमित्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *