दाभोळ : प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध,अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, सुजल खळे विरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील नानटे गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

banner 728x90

अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अश्लिल कृत्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाभोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीत सुजल अहिलेश खळे याच्याविरुद्ध भा. न्या. सहीता २०२३ चे कलम ६४ (१), २ (झ) (ड), ३ (५),३५१ (२) ३५२ सह बालकाचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधि. २०१२ चे कलम ४,६,८,१२, माहीती तंत्रज्ञान अधि. २००० चे कलम ६६ (इ) प्रमाणे दाभोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सुजल अहिलेश खळे याच्यासोबत यामध्ये आरोपीला मदत करणाऱ्या कौस्तुभ हरावडे आणि आरोपीचे आजोबा गोविंद खळे सर्व रा. मुपो नानटे, ता. दापोली याला देखील सहआरोपी करण्यात आलं आहे.

दाभोळ पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सुजल अहिलेश खळे याने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेवुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन अल्ववयीन मुलीसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले होते. दरम्यान शारीरिक संबंध ठेवून अश्लिल कृत्याचे फोटो, नग्न फोटो आरोपीने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढुन जर यापुढे शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

या सर्व प्रकारात गंभीर बाब म्हणजे आरोपी सुजल अहिलेश खळेने आपला मित्र कौस्तुभ हरावडे याच्याजवळही अल्पवयीन मुलीला संबंध ठेवण्याची धमकी दिली. सुजल याचे आजोबा गोविंद खळे यांनी मुलीला आणि तिचे चुलते आणि जयेश काका यांना मारण्याची धमकी दिली म्हणुन मुलीने याआधी आचोळे पोलीस ठाणे, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जिल्हा पालघर येथे हजर राहुन तक्रार दिली होती.

दरम्यानची ही तक्रार दाभोळ पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली. ही तक्रार ००/२०२५ अन्वये खबर दिल्याने सदरची फिर्याद आचोळे पोलीस ठाणे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जिल्हा पालघर यांच्याकडील जा.क्र पो.उ.आ./ वसई परि -२/गुन्हा – वर्ग/४९५/२०२५ दि ०७/०२/२०२५ अन्वये ईमेलद्वारे प्राप्त झाली होती.

सदर फिर्यादीमध्ये भा. न्या. सं.२०२३ चे कलम ६४ (१), २ (झ) (ड), ३५२ सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधि. २०१२ चे कलम ५ (एल) प्रमाणे गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने कलम ६ व माहीतील तंत्रज्ञान अधि २००० चे कलम ६६(इ) हे वाढील कलम सामाविष्ठ करुन दिले फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा तपास सपोनि अमोल गोरे करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *