चिपळूण : तीन दिवसांत चिपळुणात तीन आत्महत्या

banner 468x60

चिपळूणमध्ये तीन दिवसात तीन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय ठरत असून गेल्या तीन दिवसांत तालुक्यात तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत.

या तिन्ही घटनांची नोंद सावर्डे व चिपळूण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.तालुक्यातील मौजे कुशिवडे शिंदेवाडी येथील अनिल गंगाराम शिंदे (वय ४५) यांनी २७ रोजी दुपारी दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तसेच शिरगाव खालची सुतारवाडी येथील गणेश सखाराम मेस्त्री (४०) यांनी २४ रोजी दारूच्या नशेत आत्महत्या केली. तसेच शहरातील पाग पॉवर हाऊस येथील राम काशीनाथ पाटकर (६०) यांनीही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांप्रकरणी सावर्डे पोलिस अधिक तपास करत आहेत.
\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *