चिपळूण : शिक्षिका हत्या प्रकरणातील एक संशयित अद्याप फरार, अटकेत असलेल्या संशयिताला पोलीस कोठडी

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात धामणवणे येथे एका वृद्ध शिक्षक महिलेचा अत्यंत निर्देशित या खून झाला होता या घटनेनं अवघा जिल्हा हादरला होता. निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६८) असं हत्या झालेल्या शिक्षिकेचं नाव होतं.

banner 728x90

या सगळ्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास करून या प्रकरणी संशयित आरोपी जयेश भालचंद्र गोंधळेकर (वय ४६) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. जयेश याचा अन्य एक साथीदार फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. अटकेत असलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील असलेला जयेश गोंधळेकर या तरुणाने ही हत्या पैसे आणि दागिन्यांसाठीच केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेला जयेश गोंधळेकर याचा मित्र या गुन्ह्यात बरोबर होता, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या जयेश याने तपासात पोलिसांना दिली आहे. त्याच्या शोधासाठी चिपळूण पोलीस अॅक्शन मोडवर आहेत.


जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे हे नोकरी करत होता. त्या वेळेपासून सातारा येथील रवी कांबळे हा त्याचा मित्र असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जयेश याला कॉम्प्युटरमधील चांगले ज्ञान असून यामुळेच त्याने सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर कॉम्प्युटरमधली हार्डडिस्क या वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर गायब केली होती.

इतकच नाही तर त्यांचे दोघांचे अनेक कॉल असत याच ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून जोशी यांनी अनेकदा प्रवास केला आहे. त्यामुळे जयेश याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला होता. या निवृत्त शिक्षक असलेल्या वृद्ध महिलेने ठेवलेला विश्वास आत्मघातकी ठरला. जयेश भालचंद्र गोंधळेकर मूळ जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे.


संशयित तरुण जयेश हा सध्या चिपळूण पाग परिसरात राहत होता. तो टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट होता. यातूनच तो जोशी यांच्या संपर्कात आला होता. निवृत्त शिक्षिका असलेल्या जोशी यांनी यापूर्वी आसाम, पुणे आदी ठिकाणी अनेकदा प्रवास केला होता. त्या पुन्हा एकदा हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या.


यावरूनच त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या उद्देशाने जयेश गोंधळेकर याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने हा मोठा प्लॅन करून अत्यंत निर्दयीपणे हा खून केला. तोंडात कपड्याचे गोळे घालून तोंड व मान दाबून हा खून केला. त्यांचे हात पायही यावेळी बांधण्यात आले होते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो जोशी यांच्या घराच्या दिशेकडूनच येत असल्याच दिसले तसेच जोशी यांच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेश असं नाव पोलिसांना आढळले.

अन्य माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. संशयित जयेश गोंधळेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *