चिपळूण : शिरगाव येथील सुरज शिंदेंचा मासिक बैठकीत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केला अपमान, शिंदेंची कारवाईची मागणी

banner 468x60

चिपळूण येथील शिरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य यांच्या दि. १६ जुलै २०२५च्या मासिक मीटिंगमध्ये बसण्यास परवानगी मागितली असता सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सभात्याग करून अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरज शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

banner 728x90

त्यानुसार सदरच्या प्रकरणाचा पूर्ण माहिती घेण्यात यावी असा शेरा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला असून या प्रकरणात पुढे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
ग्रामपंचायत शिरगाव ता.

चिपळूण येथे भोंगाळ कारभार चाललेला असून ग्रामपंचायत अधिकारी हे शासन परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/२७०३/सी आर ( २७३२) दि. ११.०९.१९७८ नुसार ग्रामपंचायत मासिक सभेत जास्तीतजास्त लोक हजर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व त्यांच्या बैठक व्यवस्था करिता योग्य त्या उपाययोजना करीत नसून ग्रामपंचायत मधील मासिक मीटिंग ही गुप्तपणे बंद खोलीत चालते.

त्यामुळे ग्रामस्थांना अथवा इतर नागरिकांना, अर्जदाराला आपण निवडून दिलेला सदस्य आपली भूमिका सभागृहात कश्या पद्धतीने मांडतो व त्यावर सरपंच कोणता निर्णय देतात हे समजणे कठीण होते.तसेच मुंबई ग्रामपंचायत नियम १९५९ (क्र. १७६ (२), खंड (७)) मधील नियम १ नुसार कार्यक्षेत्रातील सर्व लोकांसाठी ग्रामपंचायतीची मासिक सभा खुली असली पाहिजे असे नमूद आहे.

परंतु त्याप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नसून ग्रामपंचायत अधिकारी साधी मासिक सभेच्या मीटिंगची माहिती ही नोटीस बोर्ड वर लावत नाहीत. ही बाब खूप गंभीर असून त्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत स्तरावर मासिक मीटिंग संदर्भातील नियमावलीचे पालन करण्याचे व जनजागृती करण्याची सूचना देण्याचे आदेश देण्यात आणि या विषयाचे गांभीर्य ओळखून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांवर शासकीय नियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी शिंदेनी केली आहे.


त्यामुळे ग्रामस्थांना अथवा इतर नागरिकांना, अर्जदाराला आपण निवडून दिलेला सदस्य आपली भूमिका सभागृहात कश्या पद्धतीने मांडतो व त्यावर सरपंच कोणता निर्णय देतात हे समजणे कठीण होते.तसेच मुंबई ग्रामपंचायत नियम १९५९ (क्र. १७६ (२), खंड (७)) मधील नियम १ नुसार कार्यक्षेत्रातील सर्व लोकांसाठी ग्रामपंचायतीची मासिक सभा खुली असली पाहिजे असे नमूद आहे. परंतु त्याप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नसून ग्रामपंचायत अधिकारी साधी मासिक सभेच्या मीटिंगची माहिती ही नोटीस बोर्ड वर लावत नाहीत.

ही बाब खूप गंभीर असून त्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत स्तरावर मासिक मीटिंग संदर्भातील नियमावलीचे पालन करण्याचे व जनजागृती करण्याची सूचना देण्याचे आदेश देण्यात आणि या विषयाचे गांभीर्य ओळखून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांवर शासकीय नियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी शिंदेनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *