सवतसडा धबधब्यावर एक तरुण पर्यटक पाण्यात वाहून गेल्याची बातमी शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या ‘ब्रेकिंग न्यूज’ने शहरात खळबळ उडाली. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी धावून गेले. मात्र, प्रत्यक्षात काहीही दुर्घटना न घडता, संबंधित तरुण सुखरूप सापडला.
सदर तरुण आपल्या मित्रासोबत सवतसडा धबधबा पाहण्यासाठी गेला होता. काही वेळाने तो नजरेआड झाला. मित्राने परिसरात शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे अघटित घडल्याची शंका येऊन मित्राने चिपळूणमधील ओळखीच्या व्यक्तीला “माझा मित्र पाण्यात वाहून गेला” अशी माहिती दिली.
मित्राकडून मिळालेली ही चुकीची माहिती क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘सवतसड्यावर पर्यटक वाहून गेला’ अशी चर्चा शहरात जोर धरू लागली. पाहता पाहता प्रशासन, पोलीस व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, हरवलेला समजला जाणारा तरुण डोंगर चढून वर गेला होता. परतीची वाट न सापडल्याने तो काही काळ दिसून आला नाही. मित्राने त्याला फोन केला, मात्र पावसामुळे मोबाईल खिशातून न काढल्याने संपर्क होऊ शकला नाही. शेवटी तो सुखरूप सापडला आणि अनावश्यक धावपळीचा शेवट झाला.
या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, कोणतीही माहिती सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करावी. अन्यथा अशा अफवा भीती आणि अनावश्यक गोंधळ निर्माण करतात, असे प्रशासनाने सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*