चिपळूण : सावर्डे येथे महावितरणचे लाखो रुपयांचे साहित्य चोरीला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महावितरण सबस्टेशनशेजारील एका मोकळ्या जागेतून सुमारे ७४ लाख ८४ हजार रुपयांचे

banner 728x90

लोखंडी इलेक्ट्रिक खांब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना काल, गुरुवारी (६ जून) सायंकाळ ते मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलमांन्वये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, रा. हनुमान पेठ, खेड, मूळ रा. विरार, पालघर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

महावितरणने आपले ४५० लोखंडी इलेक्ट्रिक खांब सावर्डे येथील सचिन वारे यांच्या वहाळफाटा येथील मोकळ्या जमिनीमध्ये ठेवले होते. ६ जून रोजी सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान, कंपनीच्या संमतीशिवाय अज्ञात आरोपींनी संगनमताने हे खांब चोरून नेले.

चोरीला गेलेल्या मालामध्ये १० मीटर लांबीचे १५२x१५२ साईजचे ४४ लोखंडी इलेक्ट्रिक खांब (किंमत १० लाख ६१ हजार ३४९ रुपये), १३ मीटर लांबीचे १५२x१५२ साईजचे २७ लोखंडी इलेक्ट्रिक खांब (किंमत ८ लाख ६ हजार ७२७ रुपये) आणि १० मीटर लांबीचे १००x११६ साईजचे ३०९ लोखंडी इलेक्ट्रिक खांब (किंमत ५६ लाख १६ हजार २२ रुपये) असा एकूण ७४ लाख ८४ हजार ९८ रुपयांचा ऐवज आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ट्रेलर क्रमांक आरजे ०१-जीसी ०३७१ वरील चालक सुरेश खारोल (रा. राजस्थान), तसेच ट्रेलर क्रमांक आरजे ०१-जीडी २७४७ व ट्रेलर क्रमांक आरजे ०१-जीडी ५१३९ वरील चालक आणि कंपनीचा माल घेऊन जाण्यास सांगणारा साहिल मलिक अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, गु.आर.नं. ५६/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मोठ्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *