चिपळूण : सर्व व्यापारी आणि नागरिकांना प्रशासनाचं आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी सर्व तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूणमधील वाशिष्टी, कोदवली, नारंगी, अर्जुना व शास्त्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. तसेच खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही धोका पातळीवर वाहत आहे.


चिपळूणमधील
वशिष्ठी नदी ची इशारा पातळी ओलांडली आहे. व्यापारी बंधूनी आपल्या दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, तसेच ज्या नागरिकांच्या घरी पाणी भरण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात याव नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, प्रशासनाजवळ संपर्क करावा. काही अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास नगर पालिका प्रशासन यांच्याकडे संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

banner 728x90 banner 728x90

सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३४.७० मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते ११ यावेळेत ७७ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वा भरती होती आता दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे.

पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहे. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोळकेवाडी धरण्याच्या मशीन ५.३० वा बंद करण्यात आलेल्या होत्या परंतु कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी लाढत असल्याने १२ः३० वा एक मशीन सुरू करावी लागेल व ते पाणी शहरामध्ये १ः३० वा येईल. दसपटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे ही दिलासादायक बाब आहे. सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *