चिपळूण : पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची भाजप नेते प्रशांत यादव यांनी केली पाहणी, पुलाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

Screenshot

banner 468x60

चिपळूणमध्ये शनिवारी रात्री पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल कोसळला.

banner 728x90

शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून 1965 च्या सुमारास हा ब्रीज बांधण्यात आला होता. हा पूल जीर्ण झाल्याने कोसळल्याचा अंदाज आहे. भाजप नेते प्रशांत यादव यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली आहे. नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांना निवेदन दिल्याची माहिती प्रशांत यादव यांनी दिली आहे.

प्रशांत यादव , चिपळूण

यासोबतच, चिपळूण तालुक्यातील सर्वच जीर्ण पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन स्थानिकांना यादव यांनी दिला आहे. यावेळी पिंपळीचे माजी सरपंच दादा देवरुखकर, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, राहुल पवार, अजित पवार आदी उपस्थित होते.

प्रशांत यादव, चिपळूण


खडपोली येथील एमआयडीसीकडे जाणारा प्रमुख रस्ता हा स्थानिक नागरिकांसह औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो. संबंधित मार्गावर दोन जुने पुल आहेत. सध्या त्यांची अत्यंत जीर्ण अवस्था झालेली आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांचे नव्याने बांधकाम व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे यापूर्वीच पाठपुरावा केला असल्याचं यादव यांनी सांगितलं.

पावसाळ्यानंतर तातडीने काम सुरू करावे, अशी सूचना सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आली होती. मात्र, काम सुरू होण्यापूर्वीच पूल कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेची दखल घेऊन पुलाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी प्रशांत यादव शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *