चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी, यासाठी विविध ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पतसंस्थेने विशेष उद्दिष्ट ठेवून वाढदिवसापूर्वी जाहीर केलेल्या मासिक ठेव योजनेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तर आता नवरात्रोत्सवनिमित्त नवदुर्गा सुयश ठेव योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी १५ दिवसांचा असून ठेवीला ९% टक्के व्याजदर ठेवण्यात आला असून सर्वसामान्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले आहे.
चिपळूण नागरी पतसंस्थेने सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३२ वर्षांच्या कालखंडात श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव,उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव व धनसंचय ठेव, राष्ट्र अमृतमहोत्सव ठेव, संकल्प ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. यामध्ये सुमारे ९५ हजार खातेदार विविध प्रकारच्या आवर्त व धनलक्ष्मी ठेव योजनेच्या माध्यमातून दरमहा ६ कोटी २५ लाखांच्या ठेवी वाढत आहेत. हे
खातेदार १०० रुपयांपासून गुंतवणूक करीत आहेत. तसेच महिलांसाठी सुकन्या ठेव , गृहलक्ष्मी ठेव योजना तसेच सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या राज्यातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने” आपली माणसे ! आपली संस्था या ब्रिदवाक्याने नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. पतसंस्थेमध्ये ग्राहकांच्या फायद्याच्या अनेक योजना व कर्ज योजना राबवून सर्वसामान्य ग्राहकांपासून सर्वच स्तरातील ग्राहकांना परिपूर्ण लाभ मिळवून देण्याचे आजपर्यंत प्रयत्न केले आहेत.
तर आता नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजना घटस्थापनेच्या दिवशी सुरु करण्यात आली असून या योजनेचा कालावधी १५ दिवसांचा असून ९% व्याज दर ठेवण्यात आला आहे. तरी सर्वसामान्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













