चिपळूणमध्ये गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री ११ ते ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील घाणेकरवाडी येथे घडली.
या प्रकरणी, सुशील तानाजी घाणेकर (वय ३१, मूळचे घाटकोपर, मुंबई ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घाणेकर हे गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी आले होते. त्यांनी सोबत आणलेले १५ तोळे ५ ग्रॅम ४०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने एका बॉक्समध्ये भरून लोखंडी कपाटात काळ्या पिशवीत ठेवले होते.
घाणेकर आणि त्यांचे कुटुंब घरात असतानाच, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्याने थेट कपाटातील पिशवीत ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर घाणेकर कुटुंबीयांना धक्का बसला.
तातडीने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली.
चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*