चिपळूण : आईने मुलासाठी घेतला लेकीचा बळी

banner 468x60

मुलगाच हवा, या अमानुष हट्टापायी पोटच्या अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून निर्दयीपणे ठार मारणार्‍या मातेला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

banner 728x90

शिल्पा प्रवीण खापले (रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण) असे या क्रूरकर्मा आईचे नाव असून, तिच्या या कृत्याने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली होती. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालामुळे समाजात आजही खोलवर रुजलेल्या मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेवर कठोर प्रहार झाला.


ही हृदयद्रावक घटना दि. 5 मार्च 2021 रोजी चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील घडशीवाडीत घडली होती. शिल्पा खापले हिला पहिली मुलगी होती. त्यानंतर दुसर्‍या खेपेस तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगाच व्हावा, अशी तिची आणि कुटुंबीयांची तीव्र इच्छा होती.

मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तिला दुसर्‍यांदाही कन्यारत्नच झाले. हा आनंद साजरा करण्याऐवजी शिल्पाच्या मनात मात्र निराशेने आणि द्वेषाने घर केले. मुलगी झाल्याच्या विचाराने ती इतकी सैरभैर झाली की, तिने मातृत्व आणि माणुसकीला काळिमा फासणारे पाऊल उचलले.

घरात कोणी नसताना, तिने अवघ्या एक महिन्याच्या निष्पाप मुलीला उचलले आणि पाण्याने भरलेल्या बादलीत तिचे डोके खाली आणि पाय वर अशा स्थितीत बुडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *