चिपळूण : कोकणी मुस्लिमांच्या स्वयंपाकघरातील भांडी आता ‘लोटिस्मा’च्या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळणार

banner 468x60

चिपळूण येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाला कोकणातील मुस्लीम समाजातील स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी पारंपरिक भांडी भेट मिळाली आहेत.

banner 728x90 banner 728x90

मुश्ताक व सईद देसाई बंधूंनी सुमारे एक लाख रुपये किंमतीची भांडी संग्रहालयाला अर्पण केली. या उपक्रमासाठी रमण डांगे यांचे विशेष सहकार्य लाभले. या भांड्यांना आतून व बाहेरून कल्हई केलेली असून आता अभ्यासकांना या दुर्मीळ वस्तूंचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

‘लोटिस्मा’च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी देसाई बंधूंचा उपरणे व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या प्रसंगी संचालक प्रकाश घायाळकर व संजय शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *