चिपळूण : कोकणकन्या एक्सप्रेसमधूनपडून तरुणाचा मृत्यू

banner 468x60

मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा युवक मृत्यूमुखी पडला. ही घटना जानवली येथे आज मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

banner 728x90


राहुल सावर्डेकर हा कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करत होता. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाला दिलेल्या माहितीनुसार राहूल हा दरवाजाजवळ तोंडावर पाणी मारत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो रेल्वेच्या बाहेर पडला व एका दगडावर आपटला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मृत्युमुखी पडला.


दरम्यान, या घटनेची माहिती कोकणकन्या एक्सप्रेसच्या लोकोपायलटने कणकवली रेल्वे स्टेशन येथे दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक दुर्गेश यादव घटनास्थळी दाखल झाले.

कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. १०८ रुग्णवाहिकद्वारे मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *