चिपळूण-कराड वाहतूक सुरू, कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

banner 468x60

गेल्या तीन दिवसापासून चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी भरलं होत. सध्या पाणी ओसरायला लागलेला असून काही ठिकाणची वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. आजूपासून चिपळूण-कराड वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. ११ वाजल्यापासून चिपळूणमधून गाड्या सोडल्या जात असून सर्व ठिकाणची वाहतूक सध्या सुरु आहे.

banner 728x90

मात्र कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. कोल्हापूर शहर जिल्ह्यात आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी, गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे कोल्हापूर मनपाकडून संभाव्य पुरस्थिती लक्षात घेत नागरिकांचे स्थलांतर सुरु केलं आहे. पंचगंगा नदी आज (21ऑगस्ट) सकाळी आठपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर 42 फुट 9 इंचावर पोहोचली असून आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. नदीची इशारा पातळी 43 फुट आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्यात असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असून तळकोकणात जाणारी वाहतूक सुद्धा प्रभावित झाल्याने वाहनधारकांची कसरत सुरु आहे.


कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. कोल्हापूर शहरालगत बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग ये- जा करण्यासाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केर्ली फाटा आणि वडणगे फाटा दरम्यानच्या परिसरात देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक शिवाजी पूल – वडणगे फाटा – वडणगे – निगवे दुमाला – जोतिबा रोड – वाघबिळ – रत्नागिरी या मार्गाने वळवण्यात आली आहे.

करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने सदरचा मार्ग वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग- कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे असा आहे.

त्यामुळे कोल्हापूर मनपाकडून संभाव्य पुरस्थिती लक्षात घेत नागरिकांचे स्थलांतर सुरु केलं आहे. पंचगंगा नदी आज (21ऑगस्ट) सकाळी आठपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर 42 फुट 9 इंचावर पोहोचली असून आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. नदीची इशारा पातळी 43 फुट आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्यात असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असून तळकोकणात जाणारी वाहतूक सुद्धा प्रभावित झाल्याने वाहनधारकांची कसरत सुरु आहे.


कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली दरम्यान पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. कोल्हापूर शहरालगत बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग ये- जा करण्यासाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केर्ली फाटा आणि वडणगे फाटा दरम्यानच्या परिसरात देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक शिवाजी पूल – वडणगे फाटा – वडणगे – निगवे दुमाला – जोतिबा रोड – वाघबिळ – रत्नागिरी या मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने सदरचा मार्ग वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग- कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *