चिपळूण : कामथे येथे स्वामिनी सीएनजी युनिटचे मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन, उद्योजक उदय लोध यांनी प्रशांत यादव यांच्यावर दाखवला विश्वास

banner 468x60

पेट्रोल पंप असोसिएशन स्वामिनी पेट्रोल पंपाचे संचालक प्रशांत यादव यांनीनव्याने दाखल होऊन देखील आदर्श व्यवसाय कसा करावा, हे सिद्ध केले आहे.

banner 728x90

इथले ग्राहक व नागरिकांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळाली आहे. तर आता पेट्रोल पंपाच्या सेवेत सीएनजीची भर पडली असून या व्यवसायात देखील यशस्वी होतील, असा विश्वास कन्सोर्टीयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष उदय लोध यांनी कामथे येथे स्वामिनी सीएनजी युनिटच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

कामथे येथे स्वामिनी पेट्रोलियम सीएनजी युनिटचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, कन्सोर्टीयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष उदय लोध यांच्या हस्ते फीत तर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.


यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरीचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण, उद्योजक उदय लोध, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण नागरीच्या संचालिका स्मिता चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, सुधीरकाका भागवत, बंड्या बोरूकर, छोट्या गवाणकर, महानगर गॅसचे अजित शिंदे, शिवसेना उबाठाचे युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, दळवटणेचे माजी सरपंच सचिन शेट्ये, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *