चिपळूण : दुचाकीचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी

banner 468x60

नांदिवसे मार्गावरील गाणे (राजवाडा) येथील रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. दोन दुचाकीस्वार समोरासमोर आदळल्याने मोठा अपघात झाला असून संदीप शांताराम जाधव (२५, रा. ओवळी) आणि यश सूर्यकांत घडशी (२०, रा. घडशीवाडी, कळकवणे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

banner 728x90


या अपघातामुळे रस्त्याच्या मधोमध रक्त सांडल्याचे भयावह दृश्य पाहायला मिळाले. अपघात घडल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली. समाजसेवक

. स्वप्निल शिंदे यांनी तातडीने प्रसंगावधान राखत दोन्ही जखमींना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


अपघातग्रस्तांपैकी यश घडशी हा खडपोली एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कार्यरत असून, अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिक व अॅड. अमित अशोकराव कदम तात्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींवर लक्ष ठेवत वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.


अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, बेधडक आणि भरधाव वाहनचालनामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *