चिपळूण : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रिक्त पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवाहन

banner 468x60

अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी रिक्त असलेली पदे तात्काळ भरावयाची असून महसुली गावातील रहीवासी असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

banner 728x90


इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. १५ जुलै ते २८ जुलै या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चिपळूण क्र २, परकार कॉम्पलेक्स दुसरा मजला चिपळूण २२६, तालुका चिपळूण या पत्यावर सादर करावेत.


अर्जासोबत खालील कागदपत्रे सत्यप्रतींसह जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज, ग्रामपंचायतीचा स्थानिक महसुली गावातील (ज्या महसुली क्षेत्रात अंगणवाडी आहे) वास्तव्याचा दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, अंगणवाडी कर्मचारी (सेविका/मदतनीस) असल्यास सेवेचा किमान २ वर्ष अनुभव दाखला, मागासवर्गीय असल्यास जातीचा

किंवा जातपडताळणी केली असल्यास सक्षम अधिकारी यांचा दाखला तसेच सामाजीक दृष्ट्या व शेक्षणिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास (खुला प्रवर्ग) सक्षम अधिकारी यांचा दाखला, अर्जदार किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे तसेच इतर पदवीधर / डी.एड/ बी. एड / मान्यता संस्थेचे / (MSCIT) गुणपत्रक व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.


शाळा सोडल्याचा दाखला/ आधारकार्ड/ रेशनकार्ड जोडणे आवश्यक आहे. वयोमर्यादा अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वयोमर्यादा १८ पूर्ण ते ३५ वर्षे राहिल, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सोबतच्या तपशिलानुसार, विधवा / अनाथ असल्यास तालुक्याचे तहसिलदार यांचे कडील दाखला, विवाहापुर्वीचे व विवाहानंतरचे दोन्ही नावाची एक व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र / सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला तसेच नावात बदल झाला असल्यास शासनाची नावत बदलची प्रत, लग्न पत्रिका/विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *