चिपळूण येथील वाळू उत्खनन बंदी असताना शहरातील मुख्य रस्त्यावर व अंतर्गत मार्गावर जागोजागी वाळू ‘डंपिंग’ केलेली पाहायला मिळत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे बेकायदा उत्खनन सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. येथूनच मोठ्या प्रमाणात वाळू चिपळुणात येत असताना तहसीलदार कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिवेली येथेही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून, ही वाळू थेट खेडमधील पलांजेत उतरवली जात आहे. अनधिकृत वाळू व्यवसायामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही उत्खननाला परवानगी का दिली जात नाही, असा सवाल वाळू व्यावसायिकांसह सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.
महसूलने वाळूचे माहेरघर असलेल्या गोवळकोट व कालुस्ते येथे बेकायदा वाळू उत्खनन होऊ नये म्हणून पथके तैनात ठेवली आहेत. त्यामुळे येथील उत्खनन पूर्णपणे थांबले असले, तरी त्याचा फायदा खाडीपट्ट्यातील मालदोली, गांग्रई, चिवेलीतील काही व्यावसायिक घेत होते.
या गावांमध्ये दिवस-रात्र वाळू व्यवसाय सुरू होता. मात्र आता, महसूलने येथेही लक्ष घातल्याने केवळ चिवेली येथे उत्खनन सुरू असून वाळूच्या दररोज 7 ते 8 बोटी वाळू घेऊन थेट पलांजेत जाऊन उतरवत आहेत.
दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथून दररोज वाळूच्या अनेक गाड्या येथे येत असल्याने शहरात वाळूचे ढिगारे दिसत आहेत. त्यामुळे ढिगाऱ्यांवर महसूल व बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस का कारवाई करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















