Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

चिपळूण : घरफोडी करून अडीच लाखांचे दागिने लंपास

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे एका बंद घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० ते बुधवारी सकाळी ७.०० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

banner 728x90


कळंबस्ते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये राहणारे अमर लक्ष्मण टोमके हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कडी-कुलूप तोडून चोरट्याने घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले.

यामध्ये सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठन, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, ५० हजार रुपयांचे सोन्याचे कानातील झुंबर, २५ हजार रुपयांची सोन्याची चेन आणि लहान मुलांचे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.


घरी परत आल्यावर टोमके यांना ही चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), आणि ३०५(अ) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *