चिपळूणमधील सावर्डे येथील 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याने घरी नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला
असल्याची तक्रार मुलीच्या आईने सावर्डे पोलिसात दिली आहे. ही मुलगी घरच्या अंगणात खेळत असताना या नराधमाने हे कृत्य केलं आहे.
नराधम विनायक पेढाम्बकर या 52 वर्षीय प्रौढाला सावर्डे पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. संताप आणणाऱ्या या घटनेमुळे सावर्डे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे
. सावर्डे मधील एका कॉलनीमध्ये चार दिवसापूर्वी ही घटना घडली. मुलीचे आईवडील कामाला गेल्याची संधी साधून या नराधमाने छोट्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि आपले कुकर्म साधले..
कुणाला काही न सांगण्याची तिला धमकीही दिली. आपल्या मुलीला त्रास होत असल्यानचे मुलीच्या आईला समजल्यानंतर तीने तीची विचारपूस केली आणि मुलीने धक्कादायक प्रकार आईला सांगितला.
आईने तात्काळ सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विनायक पेढाम्बकर याच्या विरोधात तक्रार दिली. सावर्डे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तात्काळ हालचाल करून आरोपीला गजाआड केले.
आरोपीवर 376, 642, 652 नुसार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान सदर घटनेमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची अफवा पसरल्याने दुर्गा शक्तीच्या अश्विनी भुस्कुटे, अशोक भुस्कुटे, श्रद्धा कदम, पत्रकार राजेंद्रकुमार शिंदे आणि पत्रकार शाहिद खेरटकर यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली असता
गुन्हा दाखल होऊन आरोपीला गजाआड करून तपास चालू असल्याची माहिती उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. आम्ही कोणत्याही प्रकारे कोणत्याही गुन्ह्यात गुन्हेगाराला सोडणार नाही,
यातील आरोपीवर अधिकाधिक कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगून कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले. या चाळीमध्ये वरील पेढाम्बकर कुटुंबियांना ठेऊ नये, ताबडतोब काढून टाकावे अशी मागणी करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*