गावातील जमिनी परगावातील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकू नयेत. एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरजेपोटी जमीन विकायची झाल्यास ती गावातील लोकांना विकावी, असा ठराव चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला. या ठरावामुळे परप्रांतीय लोकांना जमीन विकण्यास आळा बसणार आहे.
गेल्या
काही वर्षांत तालुक्यातील मोरवणे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार सुरू आहेत. अनेक परप्रांतीय लोकांनी मोरवणे येथे जागांची खरेदी करून ठेवली आहे. या जागांच्या विक्रीनंतर गावात पारंपरिक पाऊलवाटा, रस्त्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयाजित केलेल्या ग्रामसभेत गावातील जमिनी परजिल्ह्यातील लोकांना न विकण्याचा ठराव करण्यात आला.
ग्रामसभेतील चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी सांगितले की, मोरवणे येथे परजिल्ह्यातील लोक जमिनी खरेदी करीत आहेत. जमिनींची खरेदी झाल्यानंतर संबंधित लोकांकडून जागेला संरक्षक भिंत बांधली जाते. त्यानंतर नेहमीच्या पाऊलवाटा, रस्ते आदी समस्यांना त्या-त्या वाडीतील लोकांना सामोरे जावे लागते. यावरून सातत्याने वादविवाद सुरू आहेत. पाऊलवाटा बंद झाल्या की संबंधित लोक ग्रामपंचायतीकडे तक्रारी करतात, असे सांगण्यात आले.
गावातील एखाद्या कुटुंबास काही आर्थिक गरजेपोटी काही जमीन विकावयाची झाल्यास प्रथमतः त्याची माहिती गावातील लोकांना द्यावी. गावातील जमीन खरेदी करने प्रचलित दराची रक्कम संबंधित व्यक्तीला देऊ शकती गावातील लोकांना पारंपरिक रस्ते आणि पाऊलवाटांची चांगली माहिती असते. त्यामुळे परगावातील लोकांना गावकऱ्यांनी जमिनी विकू नयेत, असा ठराव एकमताने करण्यात आला. ठरावाची
प्रत जमीन खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या दुय्यम सहायक निबंधक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याशिवाय याबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













