चिपळूण : डॉ. भक्ती मानसी पवारहिने औषध निर्माण शास्त्रात मिळवली पीएच.डी.

banner 468x60

चिपळूण तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या यादीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शहरातील डॉ. भक्ती मानसी महेंद्र पवार हिने फार्मास्युटिक्स (औषध निर्माण शास्त्र) या विषयात नायपर अहमदाबाद (NIPER Ahmedabad) या देशातील ख्यातनाम संस्थेतून पीएच.डी. पदवी संपादन केली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

banner 728x90


डॉ. भक्ती हिने आपले प्राथमिक शिक्षण चिपळूणमधून पूर्ण करून बारावी विज्ञान शाखा सह्याद्री एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावडे येथून बी.फार्म. पदवी संपादन केली. त्यानंतर ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) ही केंद्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), गुवाहाटी, आसाम येथून एम.एस. (फार्मसी) ही पदवी प्राप्त केली.


त्यानंतर, पीएच.डी. प्रवेशासाठी झालेल्या ऑल इंडिया परीक्षेत देशात आठवा क्रमांक (AIR 8) पटकावत तिला नायपर अहमदाबाद येथे थेट प्रवेश मिळाला. पीएच.डी. दरम्यान तिने ६९ शास्त्रीय लेख (Publications) प्रसिद्ध केले असून, ४ पेटंट्स देखील अर्जित केले आहेत. तिच्या संशोधन कार्याला देश-विदेशातील नामांकित जर्नल्समध्ये मान्यता मिळाली आहे.


सध्या डॉ. भक्ती पवार या एन.एम.आय.एम.एस. युनिव्हर्सिटी, मुंबई येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तिच्या कर्तृत्वामुळे तिला विदेशातील नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये ‘पोस्ट डॉक्टोरल डायरेक्टरशिप’ साठी संधी प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *