चिपळुण : भरधाव कारने दुचाकीला उडविले

banner 468x60

चिपळूण बाजारपेठेत एका भरधाव कारने वन-वे मधून प्रवेश करीत अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये एकजण जखमी झाला. या अपघातात विजय प्रकाश सकपाळ (35, रा. बहादूरशेख चौक, गुरुकुल कॉलेजजवळ) असे जखमीचे नाव आहे.


याप्रकरणी शहरातील रावतळे भागात राहणारा व लोटे येथील एका रंगाच्या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत असणारा दीपक लक्ष्मण जोशी याच्यावर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


ही घटना दि. 26 मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील सिद्धकला मोबाईल शॉपीसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सकपाळ हे आपल्या मित्राबरोबर मोटारसायकलवरून बहादूरशेख नाका ते चिपळूण बाजारपेठ येथे जात होते.

यावेळी सिद्धकला मोबाईल शॉपीसमोर त्यांची दुचाकी येताच समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी ते उजव्या बाजूस पडले व त्यांच्या पायाला दुखापत झाली. शिवाय दुचाकीचा वायजर फुटून गाडीचेही नुकसान झाले.

या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दीपक जोशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कारने बाजारपेठेतून वन-वे मधून कार चालवून अनेक दुचाकींना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *